अमेरिकेत पुढील दोन वर्षांत म्हणजे २०२० आणि २०२१मध्ये मंदीसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे, असे मत एका पाहणीत दिसून आले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचे चित्र संमिश्र झाले असल्याचे इतरही काही अमेरिकी अहवालांमध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘नॅशनल असोसिएशन फॉर बिझीनेस इकॉनॉमिस्ट’ या संस्थेने ही पाहणी केली असून तिचा अहवाल सोमवारी जाहीर झाला. या पाहणीत म्हटले आहे की, २०१८ मध्ये व्याजदरात केलेली वाढ कमी करून फेडरल रिझव्‍‌र्ह या मध्यवर्ती बँकेने ठोस संदेश दिला आहे. सध्यातरी या बँकेच्या काही उपाययोजनांमुळे मंदीसदृश स्थिती रोखली गेली आहे.

या वर्षीच मंदी सुरू होण्याची शक्यता २ टक्के अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे. एनएबीईचे अध्यक्ष कॉन्सटन्स हंटर यांनी सांगितले की, पुढील वर्षीच मंदी सुरू होईल असे ३८ टक्के अर्थतज्ज्ञांना वाटते, तर ती २०२१ मध्ये सुरू होईल, अशी ३४ टक्के तज्ज्ञांची अटकळ आहे. ४६ टक्के अर्थतज्ज्ञांना फेडरल रिझर्वकडून आणखी एक दरकपात अपेक्षित आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात नाममात्र का होईना, पण समझोता होईल आणि कोंडी फुटेल, अशी आशा ६४ टक्के अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या खास शैलीत रविवारी या अहवालांचा समाचार घेताना सांगितले की, ‘कुठल्याही परिस्थितीसाठी मी तयार आहे. देशात मंदीसदृश परिस्थितीची चिन्हे मला तरी दिसत नाहीत. आमचे ग्राहक  श्रीमंत आहेत. मी कर खूप कमी केले आहेत त्यामुळे लोकांकडे खरेदीसाठी पैसा आहे. वॉलमार्टची दुकाने ग्राहकांनी भरून वाहात आहेत. अनेक अर्थतज्ज्ञांनीही मंदीची स्थिती नसल्याचे म्हटले आहे. बाकीच्या देशांची आर्थिक कामगिरी आमच्यासारखी चमकदार नाही.’

ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनी म्हटले आहे की,‘ मंदीसदृश स्थितीची चिन्हे नाहीत. लोकांना भरपूर पगार आहेत त्यामुळे  ते खर्च करतात तसेच बचतही करतात. वर्षांच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्था आणखी सुधारेल.’