अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा ठपका न्यायालयाने एका ५७ वर्षांच्या अमेरिकेची नागरिक असलेल्या महिलेवर ठेवला आहे.
सदर महिलेचे नाव डेनिस ओ-नील असे असून तिने टेडी बेअर पॅराडाइज असे टोपणनाव धारण केले होते. आपली हत्या करण्यासाठी वॉशिंग्टन डीसीला येत असल्याचे १५ पानांचे पत्र डेनिस यांनी ओबामा यांना लिहिल्याप्रकरणी तिला गेल्या २६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी डेनिसला या पत्राबाबत विचारले तर तिने सांगितले की, आपण ओबामा यांना धमकी दिली असून त्याची आपल्याला प्रत्यक्ष अंमलबजावणी करावयाची आहे, असे याबाबत नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader