एक एप्रिल निमित्त आज अनेकांची फेका-फेकी, एखाद्याला गंडवून त्याची खिल्ली उडवण्याचे प्रकार सुरू असतात. मात्र, सोशल नेटवर्किंग साईट्सवर नेटिझन्सनी ‘एप्रिल फूल डे’ला वेगळेच वळण देऊन #FekuDay, #AAPrilFoolsDay असे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आणले आहेत. या हॅशटॅसद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
सत्तेत येण्याआधी मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने अजून पूर्ण झालेली नसल्याने किंबहूना त्याबद्दल आता भाजप नेते ब्र सुद्धा काढत नसल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. त्यामुळे एक एप्रिल म्हणजे ‘फेकू डे’ म्हणून साजरा केला जातोय. तर, दिल्लीकरांनी विधानसभा निवडणुकीत राक्षसी यश मिळवून दिल्यानंतर राजकारणातील घाण ‘झाडू’न टाकण्याचे आश्वासन देणाऱया केजरीवालांच्या ‘आप’मध्येच सध्या वाद सुरू झाल्याचा नेटिझन्स #AAPrilFoolsDay साजरा करून समाचार घेत आहेत. भगत सिंह क्रांती सेनेने जोरदार पोस्टरबाजी सुरु केली आहे. केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेची घोर निराशा केली आहे. त्यामुळे एक एप्रिल हा दिवस केजरीवाल दिवस म्हणून साजरा करत आहोत, अशा आशयाचे पोस्टर दिल्लीत लावण्यात आले आहेत.
‘फेकू डे’ च्या ट्रेंडमध्ये व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर फिरत असलेले मॅसेज-
मित्रांनो, मोदी यांच्या कार्याला, संघर्षाला त्याचबरोबर आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यासाठी १ एप्रिल हा ‘जागतिक मोदी दिन’ म्हणून साजरा करायचा आहे. सर्व भारतभर नाही तर जगभर हा मेसेज गेलाच पाहिजे. १ एप्रिल = जागतिक मोदी दिन (Feku Day) हा मेसेज १० ग्रुपमध्ये पाठवा ३० दिवसांत तुमच्या खात्यात १५ लाख जमा होतील नाही केला तर, भूमीअधिग्रहण कायद्या अंतर्गत आपली जमीन अदानी अथवा अंबानीच्या नावे जमा केली जाईल ………..
कमल के फूल वाले अप्रैल फूल बनाने में सबसे माहिर है। #FekuDay #FekuDiwas
— Stylishly दबंग (@yukti_belwal) April 1, 2015
Party in bjp office for #FekuDay becoming num 1 hashtag, cheers only for them but the country is suffering @Iffidel pic.twitter.com/chLZw0mC0P
— KilaFateh #FekuDay (@KilaFateh) April 1, 2015
Congratulations … Bullet Train has arrived … #FekuDay pic.twitter.com/QtT1PkoLtu
— Aarti (@aartic02) April 1, 2015
And the award goes to… M-R Feku!!! Happy #FekuDay!! pic.twitter.com/pZ0Rr5i96j
— Hasiba B. Amin (@HasibaAmin) March 31, 2015
#AAPrilFoolsDay हॅशटॅगवरील काही निवडक ट्विट्स-
I will do Audit of Power Companies Ambani Adani, will do audit of ISRO to transfer scientists. #AAPrilFoolsDay pic.twitter.com/PqVrzD01JF
— True Hindusthani (@ani30oct) April 1, 2015
#AAPrilFoolsDay thank you @tajinderbagga pic.twitter.com/VVaDrENWgT
— Anurag saxena (@saaxenanurag) April 1, 2015
Before elections blah blah blah After elections this is what they are doing —->>>> #AAPrilFoolsDay pic.twitter.com/GSy19I8oD8
— Nivedita (@ExSecular) April 1, 2015