आत्यंतिक वेगाने अवकाशातून भूतलावर उडी मारण्याचा पराक्रम ऑस्ट्रियाच्या फेलिक्स बॉमगार्टनर या आकाशवीराच्या नावावर सोमवारी नोंदवला गेला. अत्याधिक वेगाने उडी मारण्याचा पराक्रम बॉमगार्टनरने केला असला तरी नवीन विक्रमाची नोंद करण्यात तो अपयशी ठरला आहे.
पृथ्वी आणि वातावरण यांच्या सीमारेषेवर जाऊन तेथून भूतलावर बेधडक उडी मारण्याचा अचाट पराक्रम ५० वर्षांपूर्वी जोसेफ किटिंगर या अमेरिकन हवाई दलाच्या कर्नलने केला होता. त्याने ३१ हजार ३३३ फूट उंचीवर जाऊन उडी मारली होती. फेलिक्सने एक लाख २८ हजार ०९७ फूट उंचीवर जाऊन उडी मारली. त्याचा पृथ्वीवर परतण्याचा वेग ११३७ किलोमीटर प्रतितास एवढा होता. मेक्सिकोच्या वाळवंटात फेल्किस उतरला, त्यावेळी त्याला ही उडी पूर्ण करण्यासाठी चार मिनिट व १९ सेकंदाचा कालावधी लागला. मात्र, किटिंगरचा विक्रम मोडण्यात त्याला अपयश आले. फेलिक्सच्या उडी मारण्याला एकंदर नऊ मिनिटे व तीन सेकंद एवढा कालावधी लागला. त्यात पॅराशूट उघडून खाली येण्याच्या चार मिनिटे ४४ सेकंदांचा समावेश आहे.  
‘ध्वनिमंडळ भेदले’ म्हणजे काय?
अवघ्या चार मिनिटे १९ सेकंदांत त्याने कापलेले अंतर होते एक लाख २८ हजार ९७ फूट किंवा ३९.०४ कि.मी. म्हणजे त्याचा सरासरी वेग ताशी ११३७ कि.मी. होता. मात्र या उडीदरम्यान काही सेकंद असे होते की, आवाजाचा वेग सेकंदाला ७६० मैल असताना फेलिक्सचा वेग ताशी ८३० मैल होता.
– आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेग घेणे, म्हणजे ‘साउंड बॅरिअर’ मोडणे. विमाने हे करतातच, तेव्हा त्यांच्या वेगाचे अन्य वातावरणीय घटकांशी असलेले गुणोत्तर ‘माच’ या एककाने मोजतात.. फेलिक्सचा वेग १.२४ ‘माच’पर्यंत पोहोचला होता! तोही, कोणत्याही यंत्राची मदत न घेता!
– आकाशातील आपल्या वातावरणाचा थर (ट्रोपोस्फिअर) अगदी संपत येतो तिथून, म्हणजे पृथ्वीपासून १० ते ५० किलोमीटर असलेल्या थराच्या (स्ट्रॅटोस्फिअर) मध्यावरून ही उडी त्याने मारली. माउंट एव्हरेस्टच्या किमान तिपटीने जास्त हे अंतर आहे.. तब्बल चार मिनिटांहून अधिक काळ केवळ गुरुत्वाकर्षणाच्या साह्याने खाली-खाली जाताना, त्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा वाढला.    

Story img Loader