दक्षिण आफ्रिकेतून आणल्यानंतर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवलेल्या चित्त्यांपैकी आणखी एकाचा मंगळवारी ( ९ मे ) मृत्यू झाला. चित्त्यांमध्ये झालेल्या झुंजीत ‘दक्षा’ या मादीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. ‘दक्षा’सह आतापर्यंत तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, नर ‘वायू’, ‘फिंडा’ आणि ‘अग्नि’ या चित्त्यांची मादी ‘दक्षा’बरोबर झुंज झाली. या झुंजीत ‘दक्षा’ गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर ‘दक्षा’चा मृत्यू झाला आहे. यापूर्वी २३ एप्रिलला सहा वर्षाच्या ‘उदय’ नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : अन्वयार्थ: चित्ता-मृत्यूंची चिंता

दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात २० चित्ते आणले गेले होते. यातील तीन चित्त्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला होता. सर्वात पहिल्यांदा ‘साशा’ या मादी चित्त्याचा २७ मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झालेला. तर, ‘उदय’ हा चित्ता २३ एप्रिलला निश्चल अवस्थेत आढळून आला होता. नंतर त्याचाही मृत्यू झाला. अशातच आज ( ९ मे ) ‘दक्षा’ या मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याने कुनो उद्यानात २० पैकी १७ चित्ते उरले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female cheetah daksha died in kuno national park 3 cheetah death ssa
Show comments