Hong Kong Education Experts Advise : चीनी शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कामवासनेवर विजय मिळवायचाय? तर बॅडमिंटन खेळा, असा अजब सल्लाच चीनच्या हाँगकाँगमधील शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला. लैंगिक शिक्षणासंदर्भात बोलताना हा सल्ला दिल्याने सध्या याची चर्चा रंगली आहे. शिक्षणतज्ज्ञांना एका तरुणाने प्रश्न विचारला की, “एक १५ वर्षांची मुलगी आणि तिचा प्रियकर उन्हाळ्याच्या दिवसात एकटेच अभ्यास करत असताना तिने तिचे जॅकेट काढले आणि त्याच्या खांद्यावर ठेवले तर त्याने काय करावे?”, यावर हाँगकाँगमधील शिक्षणतज्ञांने तरुणाला विवाहपूर्व लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला दिला. तसेच कामवासनेवर विजय मिळवण्यासाठी बॅडमिंटन खेळण्याचा आणि आपला अभ्यास सुरू ठेवण्यासह इतर मनोरंजनाच्या गोष्टी करण्यास सांगितले. यासंदर्भात न्यूयॉर्क टाइम्सने एक वृत्त दिलं आहे.

यासंदर्भात कायदेतज्ज्ञ आणि लैंगिक विषयातील तज्ञ शिक्षकांसह समीक्षक सांगतात की, “चीनी प्रदेशातील नवीन लैंगिक शिक्षण सामग्री विकसित झालेली नाही. मात्र, यावरून अनेकजणांचे मतमतांतरे असल्यामुळे हा गोंधळ होत आहे. दरम्यान, ‘बॅडमिंटन हे हाँगकाँगच्या मुलांमधील लैंगिक वर्तनावरील उत्तर आहे का?’, अशा शीर्षकाखाली एक आर्टीकल साउथ चायना मॉर्निंग पोस्ट वृत्तपत्राने छापलं होतं. मात्र, हाँगकाँगमधील पौगंडावस्थेतील मुला-मुलींना हे सर्व खूप मनोरंजक वाटलं.

हेही वाचा : Kolkata Rape and Murder : “सोनागाछीला येऊन तुमची शारिरीक भूक भागवा, पण बलात्कार..”; कोलकात्यातील देहविक्री करणाऱ्या महिलांचं आवाहन

गेल्या आठवड्यात ७० पानांच्या लैंगिक वर्तनाविषयी दस्तऐवजात प्रकाशित केलं होतं. त्यामध्ये पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी कार्यपत्रके आणि त्यांच्या शिक्षकांसाठीही मार्गदर्शन समाविष्ट करण्यात आलं होतं. या दस्तऐवजामध्ये विद्यार्थ्यांना आयुष्यात डेटिंग किंवा लैंगिक वर्तनासंदर्भातील कोणतेही धडे दिले गेलेले नाहीत. यासंदर्भात भर देण्यात आला होता. जे लोक प्रेम संबंधामध्ये आहेत, त्या लोकांना आपल्या जवळीकतेची मर्यादा निश्चित करणारा एक फॉर्म भरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटलं की, “लोकांमध्ये लैंगिक इच्छा असणं ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र, आपण कोणतेही काम करताना दोनदा विचार केला पाहिजे. तुमच्या इच्छावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आता जुन्या अभ्यासक्रमाची जागा नवा अभ्यासक्रमाने घेतली आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की, जेव्हा काही किशोरवयीन मुले हस्तमैथुन करतात तेव्हा त्यांना असे कृत्य करणाऱ्या गोंष्टीपासून बाजूला ठेवलं पाहिजे. तसेच व्यायाम आणि इतर गोष्टी करण्याचेही त्यात सांगितलं. तसेच चुकीच्या गोष्टींपासून दुसरीकडे लक्ष केंद्रीत करण्यात सांगतात आणि विद्यार्थ्यांना योग्य कपडे घालण्याची चेतावणी देतात. याबरोबरच अंगप्रदर्शन होईल असे कपडे घालण्याचे टाळण्यास सांगतात.”

समीक्षक असंही म्हणतात की, मार्गदर्शकही यासाठी बेजबाबदार आहेत. हाँगकाँगच्या एज्युकेशन युनिव्हर्सिटीच्या लैंगिक अभ्यासाच्या प्राध्यापक डायना क्वोक यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितलं की, “अधिकाऱ्यांनी लैंगिक विकासावर नियंत्रण ठेवण्याच्या गरजेवर भर देऊ नये, तर तरुणांना त्याचा सामना करण्यास किंवा समजून घेण्यास शिकवावे.” तसेच स्थानिक शाळांमध्ये काम करणाऱ्या आणि महिलांविरुद्ध लैंगिक हिंसाचाराच्या विरुद्ध काम करणाऱ्या एका संस्थेच्या कार्यकारी संचालक डोरिस त्स्झ-वाई चोंग यांनी सांगितलं की, तरुणांसाठी लैंगिक मार्गदर्शनाची अपुरी माहिती काही अंशी कारणीभूत आहे. त्यात लिंग भेदाचा समावेश आहे. त्यांनी असंही सांगितलं की, त्यांची संस्था अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवरील चेतावणींबद्दल देखील चिंतित आहे. एखाद्याच्या कपड्यांची निवड लैंगिक अत्याचाराला चिथावणी देणारी असू शकते ही शिकवण देणे हानीकारक घटनांना प्रेरित करू शकते.

हेही वाचा : Crime News : धक्कादायक! जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी गेल्या अन् दुसऱ्या दिवशी झाडावर आढळले मृतदेह, दोन मुलींच्या मृत्यूमुळे खळबळ

शिक्षण सचिव क्रिस्टीन चोई यांनी म्हटलं की, विशेषत: १२ ते १४ वयोगटातील मुलांना संरक्षित करण्याचा एक मार्ग म्हणून तयार करणं गरजेचं आहे. याबाबात त्यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं की, आपल्याला आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी शिकायला हवे. त्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे की आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि इतरांचा आदर कसा करावा आणि दुसऱ्यांचा सम्मान कसा करावा आपण त्यांना सांगायला हवं. जसंजसे मुला-मुलींचे वय वाढते तसे त्यांना अधिक जटिल समाज आणि वातावरणाचा सामना करावा लागतो.

दरम्यान, एज्युकेशन ब्युरोने एका निवेदनात या अभ्यासक्रमाचा बचाव केला आणि म्हटलं की, १२ ते १४ वर्षांच्या वयोगटातील मुलांना भावनिक त्रास, कायदेशीर दायित्वे, लैंगिक संक्रमित संसर्ग इत्यादींसह विवाहपूर्व लैंगिक संबंधांच्या विविध शारीरिक आणि मानसिक परिणामांना सामोरे जाण्यास मदत करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा अभ्यासक्रम स्थानिक विद्यापीठांमधील शैक्षणिकांनी विकसित केला होता. जे हायस्कूल लैंगिकेच्या विषयांमध्ये तज्ञ होते. नंतर हायस्कूलमध्ये चाचणी केली गेली आणि शिक्षक आणि शाळेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे पुनरावलोकन केले. दरम्यान, जगभरातील त्यांच्या समवयस्कांप्रमाणेच, चीन, हाँगकाँग आणि तैवानमधील तरुण लोक लैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी अनेकदा अश्लील भाषेचा वापर करतात.

Story img Loader