FIITJEE centres Shuts Down Across Delhi UP Bihar : संपूर्ण उत्तर भारतातील फोरम फॉर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी-जॉइंट एंट्रन्स एग्जामिनेशन म्हणजेच FIITJEE चे अनेक कोचिंग सेंटर्स अचानक बंद झाले आहेत. जिथे बोर्ड व प्रवेश परिक्षांची हजारो विद्यार्थी तयारी करत होते. मात्र हे कोचिंग सेंटर्स बंद झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. प्रामुख्याने नोएडा, मेरठ, गाझियाबाद, लखनौ, भोपाळ, वाराणसी, दिल्ली व पाटणा शहरांतील कोचिंग सेंटर्स बंद आहेत. नोएडातील सेक्टर ६२ मधील फिटजी सेंटरबाहेर बुधवारी सायंकाळी विद्यार्थी व पालकांनी आंदोलन केलं. पालकांनी माध्यमांना सांगितलं की “आम्हाला कोणतीही सूचना न देता अचानकच हे कोचिंग सेंटर बंद झालं आहे. मात्र, या कोचिंग सेंटर चालकांनी आमच्याकडून आधीच पूर्ण शुल्क आकारलं आहे. आम्हाला या कोचिंग सेंटर्सनी आमचे पैसे परत केलेले नाहीत”.

दरम्यान, अनेक कोचिंग सेंटर्समधील शिक्षकांना वेतन मिळालेलं नाही. त्यामुळे या शिक्षकांनी राजीनामे दिले आहेत. परिणामी अनेक कोचिंग सेंटर्समध्ये शिक्षकच नाहीत. त्यामुळेच एफआयआयटी जेईई कोचिंग सेंटर्स बंद झाले आहेत. दुसऱ्या बाजूला विद्यार्थी व पालक त्यांचं शुल्क परत मागत आहेत. दुसऱ्या बाजूला पालकांच्या तक्रारीनंतर नोएडातील फिटजी कोचिंग इन्स्टिट्युटचे प्रमुख डी. के. गोयल यांच्याविरोधात नोएडा सेक्टर ५८ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Waqf Board Bill JPC meeting
Waqf Board Bill: संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा; अरविंद सावंत, असदुद्दीन ओवेसींसह १० खासदार निलंबित
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Amul Milk Price
Amul Milk Price : अमूलचा ग्राहकांना मोठा दिलासा, दूध दरात केली कपात; जाणून घ्या नवे दर
Transport Minister Pratap Sarnaik urged creating role model for sustainable environment friendly development taking place at open space of ST
ST Bus Fare Hike : एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ, रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार
Donald Trump Ends Birth right Citizenship News
US Birthright Citizenship : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; न्यायालयाने रोखला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय
Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
Torres
Maharashtra News Updates: टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, बँक खाती गोठवली
aap mla amanatullah khan son
“मला लायसन्सची गरज नाही, माझा बाप…”, आप आमदाराच्या मुलाची वाहतूक पोलिसांवर अरेरावी, वाहतुकीचे नियम मोडून म्हणाला…

पोलिसांनी काय कारण सांगितलं?

नोएडाचे उपायुक्त राम बदन सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की एफआयआयटीजेईईद्वारे नोएडा सेक्टर ४८ मध्ये एक अभ्यास केंद्र चालवलं जातं. येथे मागील दोन दिवसांपासून वर्ग भरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे काही पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोएडा सेक्टर ५८ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अनेक पालक व विद्यार्थ्यांनी पोलीस ठाणं गाठलं होतं. या पालकांनी विनंती केली की आमच्या मुलांची अभ्यासिका घेतली जात नसेल तर आम्हाला आमचे पैसे परत हवे आहेत. पालकांची तक्रार ऐकून आम्ही एफआयआयटीजेईईचे प्रमुख डी. के. गोयल यांना पोलीस ठाण्यात बोलावलं आहे.

FIITJEE च्या कारभाराचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसल्याचं पालक सांगत आहेत. FIITJEE सारख्या नामांकित संस्थेकडून अशा अनपेक्षित व बेजबाबदार कृतीची अपेक्षा नव्हती, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे. वर्ग सुरू होणार नसतील तर आम्हाला आमचे पैसे परत मिळायला हवेत, असं एका पालकाने दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.

Story img Loader