FIITJEE centres Shuts Down Across Delhi UP Bihar : संपूर्ण उत्तर भारतातील फोरम फॉर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी-जॉइंट एंट्रन्स एग्जामिनेशन म्हणजेच FIITJEE चे अनेक कोचिंग सेंटर्स अचानक बंद झाले आहेत. जिथे बोर्ड व प्रवेश परिक्षांची हजारो विद्यार्थी तयारी करत होते. मात्र हे कोचिंग सेंटर्स बंद झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. प्रामुख्याने नोएडा, मेरठ, गाझियाबाद, लखनौ, भोपाळ, वाराणसी, दिल्ली व पाटणा शहरांतील कोचिंग सेंटर्स बंद आहेत. नोएडातील सेक्टर ६२ मधील फिटजी सेंटरबाहेर बुधवारी सायंकाळी विद्यार्थी व पालकांनी आंदोलन केलं. पालकांनी माध्यमांना सांगितलं की “आम्हाला कोणतीही सूचना न देता अचानकच हे कोचिंग सेंटर बंद झालं आहे. मात्र, या कोचिंग सेंटर चालकांनी आमच्याकडून आधीच पूर्ण शुल्क आकारलं आहे. आम्हाला या कोचिंग सेंटर्सनी आमचे पैसे परत केलेले नाहीत”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा