करोनामुळे संपूर्ण जगाचं अर्थचक्र विस्कळीत झालं आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनसारखा कठोर निर्णय घेतला. मात्र त्याने अर्थचक्रावर परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे काही देशांनी निर्बंध शिथिल करत अर्थचक्राला गती देण्यासाठी नियमावली आखली. मात्र नागरिकांना दिलेली सूट आणि नियमांचं उल्लंघन यामुळे करोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केली. यावर फिजी सरकारनं एक सूचना जारी केली आहे. करोनाची लस न घेतलेल्यांना जॉब देऊ नये, असे आदेश फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा यांनी दिले आहेत. हा आदेश कठोर वाटत असला तरी, त्यामागे करोनाचा फैलाव होऊ नये, या भावना असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. दुसरीकडे करोनाची लस घेतली नाही तर नोकरी गमवावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशात प्रत्येकाला करोनाची लस घेणं अनिवार्य आहे. देशात करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधान बेनीमारामा यांनी हे आदेश दिले आहेत.
‘करोनाची लस नाय, तर जॉब नाय’; ‘या’ सरकारनं घेतला कठोर निर्णय
पहिला डोस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवलं जाणार आहे. तर १ नोव्हेबरपर्यंत दुसरा डोस न घेतल्यास त्यांना कामावरून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-07-2021 at 14:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fiji government announce vaccine compulsory for all workers no jabs no job rmt