भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन पद्धतीने काढण्याची सुविधा डिसेंबरपासून प्रत्यक्षात येणार आहे, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे.
पाच कोटी वर्गणीदारांना या सेवेचा लाभ घेता येईल. डिसेंबरच्या मध्यावधीपासून भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे असे सांगण्यात आले. ज्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते आधार क्रमांकाला जोडलेले आहे त्यांनाच ही सुविधा मिळवता येईल. अर्ज केल्यानंतर तीस दिवसांमध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे.

Story img Loader