पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ख्यातनाम चित्रपट समीक्षक आणि लेखिका अरुणा वासुदेव यांचे गुरुवारी वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे नवी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. ‘आशियाई सिनेमाची जननी’ अशी अरुणा यांची ओळख होती.गेल्या काही दिवसांपासून अरुणा वासुदेव या आजारी होत्या. अल्झायमर आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे त्या त्रस्त होत्या. गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीय नीरजा सरीन यांनी दिली.

अरुणा यांचा विवाह दिवंगत राजनैतिक अधिकारी सुनील रॉय चौधरी यांच्याशी झाला होता. त्यांच्या पश्चात ग्राफिक डिझायनर कन्या यामिनी रॉय चौधरी आणि जावई राजकीय नेते वरुण गांधी हे आहेत. अरुणा यांनी समीक्षक, लेखक, संपादक, चित्रकार, माहितीपट निर्माता, विविध संस्थांचे विश्वस्त, अनेक पॅनेलचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. ‘आशियाई चित्रपटाची वाहक’ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. दिल्लीहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेमाया : द एशियन फिल्म क्वार्टरली’ या नियतकालिकेच्या संस्थापक-संपादक त्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ‘नेटपॅक’ या संस्थेची स्थापना करण्याचे श्रेय अरुणा यांना जाते. आशियाई चित्रपटांसाठी काम करणारी ही विश्वव्यापी संघटना आहे.