विख्यात दिग्दर्शक सत्याजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटात ‘अपू’ची भूमिका केलेले बालकलाकार सुबीर बॅनर्जी यांच्या जीवनावर ज्येष्ठ दिग्दर्शक कौशिक गांगुली चित्रपट तयार करणार आहेत.
सुबीर बॅनर्जी हे सध्या ६९ वर्षांचे असून चित्रपट जगताशी त्यांचा सध्या कोणत्याही प्रकारे संपर्क राहिलेला नाही, असे कळल्यानंतर आपल्याला धक्काच बसला, असे गांगुली म्हणाले. त्यामुळे पाथेर पांचाली या चित्रपटातील अपू म्हणजेच बालकलाकार सुबीर बॅनर्जी यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्याचे ठरविले, असेही ते म्हणाले.
सुबीर यांचा तो एकमेव चित्रपट होता आणि त्याबद्दल त्यांना आता काहीही स्मरत नाही. केंद्र सरकारी कर्मचारी म्हणून त्यांनी नोकरी केली आणि कालांतराने स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते ६९ वर्षांचे झाले तरी त्यांना सर्व जण अपू याच नावाने हाक मारतात. सत्यजित रे आपल्याला खाऊ देत आणि मस्ती करीत असल्यास शांत राहण्यास सांगत इतकेच सध्या त्यांच्या स्मरणात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा