अफगाणिस्तानात तालिबानने ताबा घेतल्यावर महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत. २१ डिसेंबर २०२२ ला तालिबानान्यांनी महिलांच्या आणि मुलींच्या विद्यापीठात जाण्यावरही बंदी घातली. अफगाणिस्तानच्या या निर्णयावर अनेक मुस्लिम देशांनी आक्षेप नोंदवला आहे. हाच मुद्दा पुढे करत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला खडे बोल सुनावले आहेत.

काय आहे जावेद अख्तर यांचं ट्विट?


गीतकार जावेद अख्तर म्हणतात तालिबान्यांनी इस्लामच्या नावे मुली, महिला यांच्या शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. एवढंच काय तर महिलांना नोकरी करण्यापासूनही रोखण्यात आलं आहे. भारतातलं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि इस्लामिक विद्वान हे याच्याशी सहमत आहेत का? त्यांच्यापैकी कुणालाच या घटनेचा निषेध नोंदवावा असं वाटत नाही? असा प्रश्न जावेद अख्तर यांनी विचारला आहे. जावेद अख्तर यांचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. काही युजर्सनी जावेद अख्तर यांना उत्तर दिलं आहे. तरी काही जणांनी जावेद अख्तर यांच्या या ट्विटचं समर्थन केलं आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Image of Yogi Adityanath
Mandir-Masjid Debate: “वक्फ बोर्डाच्या नावाखाली घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीचा ताबा परत घेणार”, योगी आदित्यनाथ यांचा इशारा
Loksatta editorial India taliban talks India boosts diplomatic contacts with Taliban Government
अग्रलेख: धर्म? नव्हे अर्थ!

फिल्ममेकर अशोक पंडित यांनी जावेद अख्तरना काय दिलं उत्तर?

जावेद अख्तर यांच्या ट्विटवर फिल्ममेकर अशोक पंडित यांनी उत्तर दिलं आहे. अशोक पंडित म्हणतात, “जावेद साहेब यांनी (मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड) यांनी आत्तापर्यंत काय केलं आहे? आणि यांच्याकडून काय अपेक्षा ठेवता? हे लोक म्हणजेही एक जमातच ना. राजौरीमध्ये काही दिवसांपूर्वी हिंदूंची हत्या झाली होती. त्यामुळे सगळ्या देशाचा थरकाप उडाला होता. मला अपेक्षा होती की तुम्ही त्यांच्याबद्दलही एक ट्विट करून सहवेदना तरी दर्शवली असती का?” असा प्रश्न अशोक पंडित यांनी विचारला आहे.

जावेद अख्तर यांच्या ट्विबाबत युजर्स काय म्हणतात?

@harsha9476 या ट्विटर युजरने जावेद अख्तर यांना उत्तर दिलं आहे की हे लोक असंच सगळं निर्माण करू पाहात आहेत एवढंच नाही तर हिजाबचं समर्थन करत आहेत. @hajeetsood नावाचा एक युजर म्हणतो जावेदजी तुम्हाला दुसऱ्या देशाची खूप चिंता वाटते आहे. आपल्या देशात वेगळं काय होतं आहे? हिजाबचं तुम्ही समर्थन करता का? त्याबाबत तुम्ही तोंड कधी उघडणार?

अफगाणिस्तानात नेमकं काय घडलं आहे?

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने डिसेंबर महिन्यात एक फतवा काढला आहे. या फतव्यानुसार आता या देशात राहणाऱ्या महिलांच्या शिक्षणाच्या आणि नोकरीच्या अधिकारावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात राहणाऱ्या महिलांना, मुलींना शिक्षण घेता येणार नाही तसंच नोकरीही करता येणार नाही. विविध विद्यापीठांमध्ये जे शिकवलं जातं आहे ते इस्लामविरोधी आहे म्हणून आम्ही हा फतवा काढल्याचं तालिबानच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं.

Story img Loader