कर्नाटकतल्या बंडखोर आमदारांवरील कारवाईनंतर हायकोर्टाच्या आदेशाने १५ मतदारसंघात नुकत्याच पोटनिवडणुका घेण्यात आल्या. याची आज मतमोजणी सुरु आहे, यामध्ये भाजपा १० जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, पुन्हा सत्ता राखण्यासाठी येडीयुरप्पा सरकारला बहुमतासाठी केवळ सहाच जागा आवश्यक आहेत. त्यामुळे निकालांच्या कलांनुसार या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव स्विकारला आहे.
Karnataka Congress leader DK Shivakumar on #KarnatakaBypolls results: We have to agree with the mandate of the voters of these 15 constituencies. People have accepted the defectors. We have accepted defeat, I don’t think we have to be disheartened. pic.twitter.com/UOLwXFASHt
— ANI (@ANI) December 9, 2019
कर्नाटकाचे निकाल समोर येत असताना काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी म्हटले की, “या १५ मतदारसंघातील जनादेश आम्हाला मान्य आहे. लोकांनी दलबदलूंना स्विकारले आहे. त्यामुळे आम्ही पराभव स्विकारला आहे. या पराभवामुळे आम्ही निराश होणार नाही.”
कर्नाटकातल्या सत्ता संघर्षात काँग्रेस-जेडीएसच्या १७ बंडखोर आमदारांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्यामुळे कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. यामुळे येडियुरप्पा सरकार बहुमतात आले आणि त्यांनी सरकार स्थापन केले. दरम्यान, हायकोर्टाने २ जागांवरील निवडणूक स्थगित करीत इतर १५ जागांवर निवडणुकीला हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार, या जागांवर नुकतीच पोटनिवडणूक पार पडली होती.
२२४ सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच संख्याबळ १७ आमदारांच्या बडतर्फीनंतर २०८ वर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. सध्या भाजपाचे १०५ आमदार असून, सत्तेवर विराजमान राहण्यासाठी त्यांना ६ आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे.