करोना लस न घेतल्यामुळे राजकीय हल्ल्याचा सामना करत असलेले आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांनी अखेर करोना लस घतली. तेजस्वीने आपला मोठा भाऊ तेज प्रताप यादव यांच्यासमवेत स्पुतनिक लस घेतली. पटनातील मेदांता रुग्णालयात स्पुतनिक लस दिली जात आहे. या दोन्ही नेत्यांनी देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सुमारे साडेपाच महिन्यांनी लस घेतली. तर तेजस्वी यादव यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, जेव्हा ७० टक्के लोक करोनाची लस घेतली तेव्हा ते लस घेतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरजेडी नेते तेजस्वी यादव बिहारमधील लसीकरणाच्या मुद्द्यावर सतत नितीश सरकारवर टीका करत आहेत. मात्र सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला होता. देशात सध्या तीन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. त्यात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, तसेच आपत्कालीन वापरासाठी रशियाच्या स्पुतनिक व्ही या लसीलाही भारताने मान्यता दिली आहे.

करोनाची लस न घेणाऱ्या तेजस्वी यादव यांना भाजपाने लगावला होता टोला!

बिहारमधील भाजपाचे प्रवक्ते राम सागर सिंह यांनी तेजस्वी यादव यांना लसीकरणाविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा आधार घेत टोला लगावला होता. राम सागर सिंह यांनी लस न घेणाऱ्या तेजस्वी यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर करोनाची लस घेण्याचा सल्ला दिला होता. “तेजस्वी यादव यांचा त्या अफवेवर विश्वास तर नाही ना ज्यात म्हटलं जातं की करोनाची लस घेतल्यामुळे लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो? जगभरातल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलं आहे की करोनाची लस घेतल्यामुळे लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर लस घेतली पाहिजे. करोनाची तिसरी लाट थोपवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. नेतेमंडळींनी लसीकरणावरून राजकारण करू नये”, असं राम सागर सिंह म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally tejaswi yadav took the corona vaccine srk