केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या शुक्रवारी ( २ सष्टेंबर ) तेलंगणा दौऱ्यावर होत्या. भाजपाच्या ‘लोकसभा प्रवास योजने’च्या अंतर्गत सीतारमण यांनी कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकुर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील एका रेशन दुकानात जात नागरिकांशी चर्चा केली. तेव्हा सीतारमण यांना त्या रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याचं निदर्शनास आलं. त्यावरुन त्या चांगल्याच भडकल्या आणि पंतप्रधानांचा फोटो रेशन दुकानात का नाही, असा सवाल विचारत अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. तसेच, सीतारमण यांनी याप्रकरणावरुन तेलंगणा सरकारवरही टीका केली आहे.

निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “बाजारात एका किलो तांदळाची किंमत ३५ रुपये आहे. तो तुम्हाला १ रुपयांना दिला जातो. केंद्र सरकार ३० रूपये खर्च उचलते, तर राज्य सरकार फक्त ४ रूपये खर्च देते. करोना महामारी सुरू झाल्यापासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पाच किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. मात्र, तेलंगणातील सरकार रेशन दुकानांमध्ये पंतप्रधान मोदींचे फोटो लावत नाही आहे. पंतप्रधानांचे बॅनर लावले जातात, तेव्हा ते फाडण्यात येतात,” असा सवाल सीतारमण यांनी उपस्थित केला आहे.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
defence minister rajnath singh
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”

“अर्ध्या तासात पंतप्रधानांचा फोटो लावा”

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेशन दुकानांतून फोटो का गायब आहे, असा सवाल सीतारमण यांनी जिल्हाधिकारी आणि नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना केला. पण, एकालाही यावरती उत्तर देता आलं नाही. पंतप्रधानांचा फोटो का नाही ते शोधा. तसेच, अर्ध्या तासात पंतप्रधानांचा फोटो दुकानात लावा, असे आदेशही यावेळी सीतारमण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

“…ते पंतप्रधानांचा दर्जा खालावणारे”

याप्रकरणावर तेलंगणाचे आरोग्य मंत्री टी हरीश राव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अर्थमंत्र्यांनी रेशन दुकानांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यास सांगणं अयोग्य आहे. अर्थमंत्री जे काही बोलत आहे ते पंतप्रधानांचा दर्जा खालावणारे आहे. हे हास्यास्पद आहे. मात्र, त्या नागरिकांना अशा पद्धतीने सांगत आहेत की सर्व तांदूळ केंद्र सरकार मोफत पुरवते,” असे प्रत्युत्तर टी हरिश राव यांनी दिलं आहे.