गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.देशात इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. पेट्रोलनं अनेक राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी इंधनाचे दरात घट होण्याची शक्यता कमी आहे, असं सांगितलं आहे. उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी स्पष्ट केलं आहे. याला सर्वस्वी काँग्रेसप्रणित युपीए सरकार जबाबरदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “काँग्रेसप्रणित युपीए सरकारने १.४४ लाख कोटी रुपयांचे ऑइल बॉण्ड जारी करून इंधनाचे दर कमी केले होते. मी तशी चालबाजी करू शकत नाही. युपीए सरकारने घेतलेल्या निर्णयाचा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. त्यामुळे इंधनाचे दरात घट होणं कठीण आहे.”, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे.

“काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने जारी केलेल्या ऑइल बॉण्ड्समुळे सरकारी तिजोरीवर भार पडत आहे. व्याजापोटी सरकारने गेल्या पाच वर्षात ६२ हजार कोटी रुपयांचे व्याज दिले आहे. तसेच २०२६ पर्यंत अजून ३७ हजार कोटी रुपये व्याज भरावा लागणार आहे.”, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे.

देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीत गेल्या २९ दिवसात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रति लिटर आहे. मात्र ४ मे पासून इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ४२ दिवसात पेट्रोल ११.५२ रुपये प्रति लिटर महाग झालं आहे. मात्र हरदीप सिंह पुरी पेट्रोलियम मंत्री झाल्यानंतर १८ जुलैपासून इंधनाचे दर स्थिर आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं तालिबानला समर्थन: म्हणाले, “गुलामीच्या जोखडातून…!”

गेल्या आठवड्यात तामिळनाडू राज्यानं पेट्रोलचे दर कमी केले आहेत. तामिळनाडूतील स्टालिन सरकारने हा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या किंमती ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्य सरकारला १,१६० कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे.

Story img Loader