जगभरातले देश आर्थिक संकटातून जात आहे. परंतु, अशा काळातही भारताची अर्थव्यवस्था मजबुतीने उभी आहे, असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातली वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील प्रश्नावर लोकसभेत उत्तर दिलं. सीतारमण म्हणाल्या, “जगभरातली वाढती महागाई आणि घसरलेला विकास दर हा चिंतेचा विषय आहे. मी आता परदेशात काय चाललंय याची काही उदाहरणं देते. त्यानंतर मी आपल्या परिस्थितीवर बोलेन. २०२२ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था केवळ ३ टक्क्यांच्या वर गेली आहे. जागतिक बँकेच्या मते २०२३ मध्ये जागतिक विकास दर २.१ टक्क्यांपर्यंत खाली जाईल. ब्रिटनमधली परिस्थिती सर्वात बिकट आहे.”, दरम्यान, यावेळी विरोधकांवर हल्लाबोल करत अर्थमंत्री म्हणाल्या, तुम्ही आश्वासनं देण्यात दंग राहिलात आणि आम्ही काम करण्यात व्यस्त राहिलो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं चित्र बदललं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, जगभरातली परिस्थिती बिकट आहे. परंतु, त्यात चीन ही एक मोठी आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मी चीनच्या अर्थव्यवस्थेशी आपली तुलना करणार नाही. परंतु ज्या अर्थव्यवस्था मजबूत मानल्या जात होत्या, त्या आज ग्राहकांच्या कमतरतेशी झगडताना दिसत आहेत. चीन, ब्रिटन आणि पाठोपाठ अमेरिकेची अर्थव्यवस्थाही घसरली झाली आहे. त्यामुळे त्यांचा शेअर बाजार हादरला आहे. ही परिस्थिती पाहून तुम्ही आता भारताची अर्थव्यवस्था समजून घेतली पाहिजे.

Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ज्यांना जिथे जायचं ते तिथे जाऊ शकतात”, अजित पवार गटाच्या नेत्याचं भुजबळांच्या नाराजीबाबत मोठं विधान

अर्थमंत्री म्हणाल्या, २०१३ मध्ये मॉर्गन आणि स्टॅन्लेने भारताला सर्वात कमकुवत अर्थव्यवस्थेंच्या यादीत समाविष्ट केलं होतं. त्याच मॉर्गन स्टॅन्लेने आज भारताला अव्वल स्थानी ठेवलं आहे. आज आपला देश सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं आर्थिक धोरण इतकं सुधारलं आहे की कोव्हिड संकटावर मात करून आपण नव्या ताकदीने उभे राहिलो आहोत आणि पुढे जात आहोत.

निर्मला सीतारमण म्हणाल्या, जन धन योजना, डिजिटल इंडिया मिशन, आयुष्मान भारत, जन औषधी केंद्र, अशा योजनांचा सर्वांना फायदा झाला आहे. गेली सहा दशके आपण ‘गरिबी हटाओ’ असा नारा ऐकत होतो, पण तसं झालं का? परंतु, आता आपण गरिबी दूर केल्याचं चित्र तुम्ही पाहताय

हे ही वाचा >> VIDEO : “मोदी परमात्मा आहेत का?” मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यसभेत संतप्त सवाल; नेमकं काय घडलं वाचा!

केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, पूर्वी आपण फक्त बनवू, उभारू, तयार करू असल्या घोषणा ऐकायचो, आता मात्र बनवलं, उभारलं, तयार केलं असं ऐकतोय. पूर्वी म्हणायचे, वीज मिळेल, आता लोक म्हणत आहेत वीज मिळालीय. पूर्वी म्हणायचे, पीएम आवास योजनेअंतर्गत घर बांधून मिळेल आता लोक म्हणत आहेत घरं बाधून मिळाली. पूर्वी म्हणायचे रस्ता बांधू, आता लोक म्हणत आहेत रस्ते बांधले. पूर्वी म्हणायचे विमानतळ बांधू, आता लोक म्हणत आहेत विमानतळं बांधली. पूर्वी म्हणायचे स्वस्त राशन मिळेल, आता जनता म्हणतेय स्वस्त राशन मिळतंय. तुम्ही (विरोधक) फक्त स्वप्नं दाखवत होता, परंतु आम्ही जनतेची स्वप्न साकार करत आहोत.

Story img Loader