जगभरातले देश आर्थिक संकटातून जात आहे. परंतु, अशा काळातही भारताची अर्थव्यवस्था मजबुतीने उभी आहे, असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातली वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील प्रश्नावर लोकसभेत उत्तर दिलं. सीतारमण म्हणाल्या, “जगभरातली वाढती महागाई आणि घसरलेला विकास दर हा चिंतेचा विषय आहे. मी आता परदेशात काय चाललंय याची काही उदाहरणं देते. त्यानंतर मी आपल्या परिस्थितीवर बोलेन. २०२२ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था केवळ ३ टक्क्यांच्या वर गेली आहे. जागतिक बँकेच्या मते २०२३ मध्ये जागतिक विकास दर २.१ टक्क्यांपर्यंत खाली जाईल. ब्रिटनमधली परिस्थिती सर्वात बिकट आहे.”, दरम्यान, यावेळी विरोधकांवर हल्लाबोल करत अर्थमंत्री म्हणाल्या, तुम्ही आश्वासनं देण्यात दंग राहिलात आणि आम्ही काम करण्यात व्यस्त राहिलो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं चित्र बदललं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा