नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उत्तर प्रदेशबाबतच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी अर्थमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. आम्हाला उत्तर प्रदेशच्या संस्कृतीचा अभिमान आहे, असे उत्तर प्रियंकांनी दिले आहे. आमचा अपमान करू नका असेही त्यांनी बजावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. त्याबाबत अर्थमंत्री सीतारामन यांना विचारले असता अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी हे उत्तर देतील, असे त्यांनी सांगितले. त्यावर राहुल गांधी यांना भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प समजलाच नाही अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी या टीकेबाबत दिली. त्यानंतर चौधरी यांच्या राहुल यांच्याबाबत टिप्पणीवर निर्मला सीतारामन यांनी चौधरी यांनी अगदी उत्तर प्रदेश छापाचे (यूपी-टाइप) उत्तर दिले असे सांगितले. राज्य सोडून पळून जाणाऱ्या खासदाराला हे पुरेसे आहे, असे त्यांनी नमूद केले. मात्र सीतारामन यांच्या उत्तर प्रदेशबाबत वक्तव्यावर प्रियंका गांधी यांनी समाजमाध्यमाद्वारे टीका केली आहे.