पीटीआय, नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याऐवजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना युरेनस-प्लुटो या ग्रहांमध्ये अधिक रस असल्याचे सांगून काँग्रेसने बुधवारी त्यांना टीकेचे लक्ष्य केले. भडकलेल्या महागाईवर कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, हे सांगण्याऐवजी अर्थमंत्री ‘नासा’तर्फे प्रसृत झालेल्या आवकाशाची छायाचित्रे ट्विट करण्यात व्यग्र आहेत, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सीतारामन यांनी मंगळवारी ‘नासा’च्या नवीन अवकाश दुर्बिणीद्वारे प्रसृत झालेली अवकाशातील सुस्पष्ट छायाचित्रे ‘रिट्विट’ केली होती. याच दिवशी केंद्रीय सांख्यिकी आणि योजना अंमलबजावणी मंत्रालयाने किरकोळ महागाई दराची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार जूनमध्ये किरकोळ महागाई दर अगदी थोडासा घसकरून ७.०१ झाला आहे. किरकोळ महागाई दर रिझर्व बँकेने निश्चित केलेल्या समाधानकारक स्तरांपेक्षा जास्त असल्याचा हा सलग सहावा महिना आहे. यावर काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितले, की  ही आकडेवारी आल्यानंतर आमची अशी अपेक्षा होती, की अर्थमंत्री महागाई आटोक्यात आणण्यासाठीची उपाययोजना जाहीर करतील. परंतु त्यांचे प्राधान्य त्याला नसून, या अन्य गोष्टींनाच आहे. त्यांना गुरू, प्लूटो, युरेनस अशा ग्रहांमध्ये रस आहे. आपल्या अर्थमंत्री अवकाशातील ग्रहांचा मार्ग आपल्याला दाखवत आहेत. परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरळीत पुढे नेण्यासाठीचा रस्ता त्या दाखवण्यास अपयशी ठरल्या आहेत. गेल्या आठ वर्षांत भाजप सरकारचे लक्ष्य भलतेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामाजिक ध्रुवीकरण आणि असहिष्णुतेलाच प्राधान्य दिले जात आहे. परंतु वाढती महागाई, बेरोजगारी व रुपयाच्या ढासळलेल्या मूल्याला सावारण्यासाठी प्राधान्याने कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. गेल्या ४५ वर्षांत देशाला सर्वाधिक बेरोजगारीला तोंड सध्या द्यावे लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.  ‘सात अंक निवडून बरबादी!’ भाजप सरकार सात अंक निवडून बरबादीला निमंत्रण देत आहे. किरकोळ महागाई दर ७.०१, बेरोजगारी दर ७.८ आणि गेल्या सहा महिन्यांत रुपया डॉलरच्या तुलनेत सात टक्क्यांनी घसरला आहे. हे आकडे चिंताजनक असून, भाजप सरकार मात्र गाढ निद्रेत असल्याची टीका काँग्रेस प्रवक्त्यांनी केली.