Finance Ministry asks its employees to Strictly Avoid the use of AI tools or AI Apps : केंद्र सरकारने अर्थ मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयातील उपकरणांवर एआय टूल किंवा एआय अॅप्स वापरण्यास मज्जाव केला आहे. यामुळे सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपयनीयतेचा भंग होऊ शकतो, अशी भीती सरकारने व्यक्त केली आहे. त्यामुळे कार्यालयीन कामांसाठी कार्यालयातील कोणत्याही उपकरणांमध्ये एआय टूल्सचा वापर करण्यास टाळण्यास सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलिया आणि इटलीसारख्या देशांनी डेटा सुरक्षेच्या धोक्यांच्या हवाला देत डीपसीकच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. बुधवारी ओपन एआयचे प्रमुख सॅम ऑल्टमन हे भारतात आले होते. ते आयटी मंत्र्यांना या भेटीत भेटणार आहेत. त्यादरम्यानच या बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत.

ऑफिसच्या संगणक किंवा इतर उपकरणांमधील एआय टूल्स आणि एआय अॅप्स (चॅटजीपीटी, डीपसीक इ.) सरकारी डेटा आणि कागदपत्रांच्या गोपनीयतेला धोका निर्माण करतात, असं भारतीय अर्थ मंत्रालयाने २९ जानेवारी रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ही माहिती खरी असल्याचे सांगितले असून गेल्या आठवड्यातच हे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. तसंच, इतर मंत्रालयांसाठी असेच निर्देश जारी केले आहेत की नाही याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.