मलेशियातील विमान वाहतूक कंपनी एअर एशियाला भारतात टाटा सन्स ग्रुप आणि टेलिस्ट्रा ट्रेडप्लेस प्रायव्हेट लिमिटेडच्या साह्याने नवी कंपनी काढण्यासाठी गुंतवणुकीला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी मंजुरी दिली. सुरुवातीला एअऱ एशिया भारतामध्ये ८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ४९ टक्क्यांपर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. त्या धोरणानुसारच एअर एशियाला भारतात गुंतवणूक करण्यास परवानगी दिली असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. ‘द फॉरेन इनव्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड’चे प्रमुख अरविंद मायाराम यांनी ही मंजुरी दिली. एअर एशियाला आता नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे (डीजीसीए) आवश्यक परवाने मिळवण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे, असेही या अधिकाऱयाने सांगितले.

Story img Loader