ट्विटरवर मत व्यक्त करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बांगलादेशच्या वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांच्याविरोधात उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्य़ातील एका मुस्लीम धर्मगुरूने बुधवारी रात्री स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तस्लिमा नसरीन यांनी  ६ नोव्हेंबर रोजी मुस्लीम धर्मगुरूंविरोधात ट्विटरवरून मतप्रदर्शन केले होते. मात्र तस्लिमा यांच्या या मतप्रदर्शनामुळे मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मुस्लीम धर्मगुरूंनी केला आहे. तसेच याप्रकरणी हसरत रजा खान नूरी मिया यांनी बुधवारी रात्री कोटवाली पोलीस ठाण्यात तस्लिमा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तस्लिमा यांनी ट्विटरवरून मतप्रदर्शन करून मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, तस्लिमा यांचा पासपोर्ट जप्त करून त्यांना अटक करावी, अशी मागणी मुस्लीम धर्मगुरूंनी केली आहे.

Story img Loader