FIR Agaisnt Rahul Gandhi : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील प्रत्येक संस्था आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेसची लढाई केवळ भाजप आणि संघाशीच नव्हे तर ‘इंडियन स्टेट’शीही (भारतीय राज्य यंत्रणा) आहे, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले असून यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि १९७(१)d अंतर्गत गुवाहाटी येथील पान बाजार पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताचे सार्वभौमत्व एकता आणि अखंडता धोक्यात आणणाऱ्या कृत्यांसाठी हा गुन्हा दाखल केला जातो.

एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. चेतिया यांनी असा दावा केला की गांधींचे शब्द हे राज्याच्या अधिकाराला वैध ठरवण्याचा प्रयत्न होते, ज्यामुळे अशांतता आणि फुटीरतावादी भावना भडकवणारे धोकादायक कथा तयार होतात.

“आपला लढा भारतीय राज्याविरुद्ध असल्याचे घोषित करून राहुल गांधींनी जाणीवपूर्वक विध्वंसक कारवाया आणि लोकांमध्ये बंडखोरी भडकावली आहे. हा राज्याच्या अधिकाराला वैध ठरवण्याचा आणि त्याला एक विरोधी शक्ती म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न आहे. एक धोकादायक कथा जे अशांतता आणि फुटीरतावादी भावनांना भडकावू शकते”, असं चेतिया यांनी एफआयआरनुसार आपल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे.

“विरोधी पक्षनेते म्हणून, लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी गांधींची आहे. परंतु त्याऐवजी, त्यांनी भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणून खोटे पसरवण्यासाठी आणि बंडखोरीला चिथावणी देण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर करणे निवडले”, असं एफआयआरमध्ये नमूद आहे. “लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास संपादन करण्यात असमर्थ ठरल्याने, आरोपी आता केंद्र सरकार आणि भारतीय राज्याविरुद्ध असंतोष भडकावू पाहत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भूमिका पाहता हे वर्तन चिंताजनक आहे.”

Story img Loader