कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयने आज दोन कंपन्यांवर बनावट कागदपत्रांचा वापर व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला असून दिल्ली व हैदराबाद येथील सोळा ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने इन्फ्रास्ट्रक्चर अॅंड स्टील कंपनीच्या विरोधात बनावट कागदपत्रांचा वापर व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. सीबीआयने हे गुन्हे दाखल केल्यानंतर या कंपन्यांच्या हैदराबाद, सतना, सिकंदराबाद, जयपूर, विशाखापट्टनम, रूरकेला व दिल्ली येथील कार्यालयांवर छापे टाकले. या कंपन्यांनी कोळसा खाणी मिळवण्यासाठी पात्रता सिद्ध करण्याकरिता उलाढालीचे खोटे आकडे दाखवले होते. २००६-०९ या काळातील कोळसा खाण वाटपाच्यावेळची ही प्रकरणे असून त्यात सीबीआयने अगोदर सात एफआयआर दाखल केलेले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2012 रोजी प्रकाशित
दोन कंपन्यांवर गुन्हा दाखल
कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयने आज दोन कंपन्यांवर बनावट कागदपत्रांचा वापर व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला असून दिल्ली व हैदराबाद येथील सोळा ठिकाणी छापे टाकले आहेत.
First published on: 16-10-2012 at 05:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against two company