मंगळवारी (१८ जुलै) बंगळुरू येथे विरोधी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला देशातील प्रमुख २६ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विरोधी पक्षांच्या आघाडीचं नवीन नामकरणही करण्यात आलं. या आघाडीचं नामकरण ‘INDIA’ अर्थात ‘Indian National Developmental Inclusive Alliance’ असं करण्यात आलं आहे. या नामकरणानंतर दुसऱ्याच दिवशी २६ विरोधी पक्षांविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी ‘इंडिया’ नावाचा अयोग्य वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी २६ विरोधी पक्षांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार अविनीश मिश्रा यांनी केली आहे.
‘या’ राजकीय पक्षांविरोधात गुन्हा दाखल
इंडियन नॅशनल काँग्रेस (INC)
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC)
द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK)
आम आदमी पक्ष (AAP)
जनता दल (संयुक्त)
राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)
झारखंड मुक्ती मोर्चा (JMM)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) – (शरद पवार गट)
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC)
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP)
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय)
रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP)
शिवसेना (UBT)
समाजवादी पक्ष (एसपी)
राष्ट्रीय लोक दल (आरएलडी)
अपना दल (कमेरवादी)
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
मरुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK)
विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK)
कोंगुनाडू मक्कल देसाई काची (KMDK)
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी)
मनिथनेय मक्कल काची (MMK),
इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)
केरळ काँग्रेस (M)
केरळ काँग्रेस (जोसेफ)
दिल्लीतील बाराखम्बा पोलीस ठाण्यात संबंधित २६ विरोधी पक्षांवर ‘एम्ब्लेम्स’ कायद्याचे कलम २ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरोधात लढण्यासाठी आपल्या आघाडीचं नामकरण ‘INDIA’ असं केलं आहे. पण या नामकरणाच्या दुसऱ्याच दिवशी २६ विरोधी पक्षांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.