पीटीआय, गुवाहाटी
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कथितरित्या देशाच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण होईल अशी टिप्पणी केल्याचा आरोप करून आसाममध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. मोनजित चेतिया यांनी पानबाजार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान राहुल गांधी यांनी ‘‘काँग्रेसला केवळ भाजप आणि संघाशी नाही तर त्यांनी ताब्यात घेतलेल्या सरकारी संस्थेचाही सामना करायचा आहे, आपल्याला राज्य यंत्रणांशी लढा द्यायचा आहे,’’ असे वक्तव्य केले होते. राहुल यांनी देशविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या खास शुभेच्छा; म्हणाले, “ऐतिहासिक…”

ही तक्रार राजकीय स्टंट आहे अशी टीका आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांनी केली. दरम्यान, २०१९च्या लोकसभा निवडणूक प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याच्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली.

हेही वाचा : Donald Trump : राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिलं भाषण, “अमेरिकेचं सुवर्ण युग या क्षणापासून…”

‘सरसंघचालकांनी माफी मागावी’

नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य चळवळीबद्दल केलेल्या देशविरोधी विधानाबद्दल माफी मागावी या मागणीचा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवरील पोस्टमध्ये पुनरुच्चार केला. राम मंदिर बांधले त्याच दिवशी देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेले स्वातंत्र्य राजकीय होते, असे विधान भागवत यांनी केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir registered against rahul gandhi in assam for his indian state statement css