लखनऊमधील मंत्रालयात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. दुसऱ्या मजल्यावरील बापू भवनमध्ये ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच इमारत रिकामी करण्यात आली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बापू भवनमध्ये उत्तर प्रदेश सरकारचे अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. सर्वांना लगेच बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरीत घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
#UPDATE Fire that broke out at Bapu Bhawan (second floor) in Lucknow secretariat is now under control.
— ANI UP (@ANINewsUP) March 28, 2017
आपण सुरक्षितपणे बापू भवनमधून बाहेर पडल्याचे मंत्री मोहसीन रझा यांनी ट्विट करून सांगितले. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. यापूर्वी नोव्हेंबर २१०५ मध्येही आग लागली होती.