इराणच्या तेहरानमधील कुप्रसिद्ध ‘इविन’ तुरुंगात शनिवारी रात्री भीषण आगली. महसा अमिनी या इराणी तरुणीच्या मृत्यूनंतर देशात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या तुरुंगात गोळीबार आणि चकमक झाल्याचेही वृत्त आहे. या तुरुंगात राजकीय कैदी, पत्रकार आणि सरकारविरोधी कार्यकर्ते बंदिस्त आहेत. इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनात अटकेत असलेल्या नागरिकांनाही याच तुरुंगात डांबण्यात आलं आहे. तुरुंगात लागलेल्या आगीच्या घटनेचा व्हिडीओ इराणी पत्रकार मसीह अलीनेजाद यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Anti Hijab Protests: हे तर अमेरिका, इस्रायलचं षडयंत्र; इराणच्या सर्वोच्च नेत्याचा दावा

या घटनेत आठ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. दरम्यान, या तुरुंगात झालेल्या चकमकीचा संबंध हिजाबविरोधी आंदोलनाशी आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या तुरुंगात बंदिस्त असलेल्या अमेरिकी कैद्यांच्या सुरक्षेबाबत अमेरिका प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तुरुंगाला लागलेली आग नियंत्रणात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विश्लेषण: महसा अमिनींच्या मृत्यूनंतर चर्चेत असलेल्या संस्कृतीरक्षक पोलिसांचे काम काय? इराणमध्ये हिजाबचे नियम काय आहेत?

इराणी तरुणी महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटलं आहे. हिजाब संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमिनी यांना संस्कृतीरक्षक पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात महसा यांचा मृत्यू झाला. कट्टरपंथीय संस्कृतीरक्षकांनीच अमिनींचा जीव घेतल्याचा आरोप करत इराणमधील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. मसिह अलिनेजाद या इराणी पत्रकार आणि कार्यकर्तीने ट्विटरवर महिलांचे केस कापतानाचे व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे.

Story img Loader