बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या शॉर्टसर्किटनंतर गॅस सिलिंडरचाही स्फोट झाल्यामुळे ही आग जास्तच पसरली. या आगीत जवळपास ३० जण होरपळले असून यातील १० जण गंभीर जखमी झालेच्या म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुरुवातील शॉर्टसर्किट आणि नंतर सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथे भीषण आग लागल्याची घटना घडली. छट पूजेसाठी येथे एका घरात स्वयंपाक करण्यात येत होता. मात्र यावेळी अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्यामुळे भीषण आग लागली. त्यानंतर या आगीत गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला. परिणामी आगीने उग्र रुप धारण केले. या घटनेत साधारण ३० जण होरपळल्याचे म्हटले जात आहे. यातील १० जणांची प्रकृती गंभीर आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे ७ पोलीसदेखील या आगीत जखमी झाले आहेत.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
uttar pradesh jhanshi hospital fire
Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती

आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींवर औरंगाबादमधील सादार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शॉर्टसर्किट आणि सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे म्हटले जात असले तरी, पोलिसांनी त्याची अद्याप पुष्टी केलेली नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.