युगांडा देशातील दृष्टिहीन मुलांच्या शाळेला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी ही आग लागल्याचे म्हटले जात असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार युगांडामधील मुकोनो जिल्ह्यातील सलमा स्कुल या दृष्टिहीन मुलांसाठीच्या शाळेला अचानकपणे आग लागली. या आगीत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना किसोगा येथील हेरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. युगांडा पोलिसांनी तशी माहिती दिली आहे.

या घटनेबाबत युगांडामधील मंत्री काहिंदा ओटाफिरे यांनी अधिक माहिती दिली आहे. या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश छोटी मुलं आहेत. घडलेल्या घटनेची पूर्ण चौकशी केली जाईल. या घटनेची चौकशी केल्यानंतर दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असे ओटाफिरे म्हणाले आहेत.