मेक्सिकोमध्ये गुरुवारी एका ट्रेनने तेलाच्या टँकरला धडक दिली. या धडकेनंतर मोठी आग लागली आहे. आगीमुळे फाटकाशेजारी असणाऱ्या अनेक घरांना फटका बसला आहे. अनेक घरांमध्ये ही आग लागली असल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्यासंबंधीची माहिती अद्याप मिळालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली होती.
दरम्यान या दुर्घटनेत कोणी जखमी किंवा जीवितहानी झाली आहे का यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.