मध्य प्रदेशमध्ये उधमपूर-दुर्ग एक्सप्रेसला आग लागल्यानं खळबळ उडाली. या रेल्वेच्या ए१ (A1) आणि ए२ (A2) कोचमध्ये आग लागल्यानं ही घटना घडली. अद्याप आगीमागील कारण अस्पष्ट आहे. हेतमपूर रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर अचानक रेल्वे डब्यात आग लागली. यानंतर तात्काळ रेल्वेतील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. कुणालाही दुखापत झालेली नाही.
आगीनंतर ही रेल्वे तातडीने थांबवण्यात आली. तसेच रेल्वेतील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. रेल्वेचा पुढील भाग गाडीच्या इतर भागापासून वेगळा करण्यात आला. याशिवाय या मार्गावरील इतर सर्व रेल्वे वेळापत्रकानुसारच मार्गक्रमण करत आहेत. या आगीत अद्याप कुणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवम शर्मा यांनी दिली.