पंजाब मेल एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी चक्क चालत्या रेल्वेतून उड्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचीही माहिती आहे. या घटनेत २० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ७ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमी प्रवाशांना शाहजहांपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Bangladesh Crisis : “पिस्तुल रोखलं, बेड्या ठोकून वीजेचे झटके दिले”, BNP कार्यकर्त्यांनी सांगितली पोलिसांच्या अत्याचाराची कहाणी

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, गाडी क्रमांक १३००६ पंजाब मेल एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. ही एक्सप्रेस अमृतसरहून हावडाच्या दिशेने जात होती. ही गाडी सकाळी साडेआठच्या सुमारास बिलपूर कटरा स्टेशनवर पोहोचताच, गाडीच्या जनरल डब्यातून धुराचे लोट दिसू लागले. ते बघून गाडीच्या बोगीचा आग लागल्याची अफवा पसरली. यावेळी प्रवाशांनी घाबरून चालत्या रेल्वेतून उड्या मारल्या.

हेही वाचा – Kolkata Doctor Murder : डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून खून; इयरबड्सच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

दरम्यान, यावेळी इतर बोगीत चेंगराचेंगरी झाल्याचंही बघायला मिळालं. या घटनेत एकूण २० पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी ७ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाडी थांबवून तपासणी केली असता सर्व काही ठीक असल्याचं दिसून आलं. तसेच जखमी प्रवाशांना शाहजहांपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire rumour in punjab mail passengers jumped from moving train spb