Russia School Firing News: रशियामध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १३ लोकांचा मृत्यू झाला असून, २१ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे. Izhevsk शहरात हा गोळीबार झाला आहे. गोळीबारानंतर हल्लेखोराने आत्महत्या केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलं असल्याचं वृत्त एएफपीने दिलं आहे.
“हल्ल्यामध्ये शाळेचे दोन सुरक्षारक्षक, दोन शिक्षक तसंच पाच लहान मुलांचा समावेश आहे,” अशी माहिती रशियाच्या तपास यंत्रणेने टेलिग्रामच्या माध्यमातून दिली आहे. यावेळी त्यांनी हल्लेखोराने आत्महत्या केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, “हल्लेखोराने काळा शर्ट घातला होता, ज्याच्यावर नाझीचं चिन्ह होतं. त्याच्याकडे कोणतंही ओळखपत्र सापडलेलं नाही. त्याची ओळख पटवली जात आहे”. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात २० जण जखमी झाले आहेत. हल्ल्यात काही लहान मुलंही जखमी झाली आहेत. घटनास्थळी बचाव आणि वैद्यकीय पथक दाखल झालं आहे.