अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये गोळीबार झाला आहे. टेक्सास येथील शॉपिंग मॉलमध्ये ही घटना घडली आहे. या गोळीबारात ८ जण ठार झाले आहेत तर सात जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराला ठार करण्यात आलं आहे. जे लोक जखमी झाले आहेत त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. टेक्सासच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथल्या प्रीमियम आऊटलेट मॉलवर हल्लेखोराने गोळीबार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हल्लेखोराच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं आणि त्यात या हल्लेखोराला ठार केलं आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक या व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहेत. तर एका व्हायरल व्हिडीओत हल्लेखोराचा चेहराही दिसतो आहे. त्यानंतर त्याला ठार करण्यात आलं आणि त्याच्या मृतदेहाजवळ जी बंदुक आहे ती देखील या व्हायरल फोटोंमध्ये दिसते आहे.

कॉलिन काऊंटीचे प्रमुख अधिकारी यांनी टेक्सासमध्ये गोळीबार झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच लोक या घटनेत जखमी झाल्याचंही म्हटलं आहे. प्रमुख अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने हे देखील सांगितलं आहे की मॉलमध्ये काही लोक अडकले आहेत. त्यांच्याविषयी अद्याप आम्हाला माहिती मिळालेली नाही. आमच्या मॉलमध्ये जी घटना घडली त्याचा आम्हाला खेद वाटतो. आमच्या मॉलला भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना हे सहन करावं लागलं याबाबत आम्हाला दुःख झालं आहे असं मॉल चालवणाऱ्या कंपनीने म्हटलं आहे.