झारखंड काँग्रेसमधील गटबाजी नवे राज्य प्रभारी बी.के. हरिप्रसाद यांच्यासमोरच चव्हाटय़ावर आली. दोन गटांमधील वादात नेत्याच्या अंगरक्षकाने हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली. या घटनेचा अहवाल २४ तासांस देण्याचे आदेश हरिप्रसाद यांनी प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत यांना दिले.
दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर गोळीबार झाल्याचे एका काँग्रेस नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र नंतर पत्रकार परिषदेत हरिप्रसाद यांनी अशी घटना पक्ष कार्यालयाबाहेर घडल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जर कोणी काँग्रेस कार्यकर्ता दोषी असेल तर तो कितीही मोठा असला तरी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा हरिप्रसाद यांनी दिला.
ही घटना पक्ष कार्यालयाबाहेर घडल्याचे हरिप्रसाद यांनी सांगितले, तेव्हा त्यांना याबाबत चित्रीकरण दाखवण्यात आले. मात्र असे काही घडले नाही याचा साक्षीदार मी आहे असे सांगत गटबाजी नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मतभेद असतात, पण ते एका मर्यादेत असावेत, कुणी संयम सोडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या घटनेनंतर पक्ष कार्यालय परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
गटबाजीतून झारखंड काँग्रेस कार्यालयात हवेमध्ये गोळीबार
झारखंड काँग्रेसमधील गटबाजी नवे राज्य प्रभारी बी.के. हरिप्रसाद यांच्यासमोरच चव्हाटय़ावर आली. दोन गटांमधील वादात नेत्याच्या अंगरक्षकाने हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली. या घटनेचा अहवाल २४ तासांस देण्याचे आदेश हरिप्रसाद यांनी प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत यांना दिले.
First published on: 21-06-2013 at 07:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing near congress bhavan in ranchi following clash between party factions