अमेरिकेतील कनेक्टीकट भागातील ‘सॅण्डी हॉक एलिमेण्टरी स्कूल’ मध्ये एका अज्ञात माथेफिरूने गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास केलेल्या बेछूट गोळीबारात २४ जण ठार झाले असून त्यामध्ये १७ मुलांचा समावेश आहे. या गोळीबारानंतर तो माथेफिरूही ठार झाल्याचे समजते. ‘केजी’ च्या वर्गात हा गोळीबार झाल्यामुळे प्रामुख्याने लहान मुलेच ठार झाल्याचे सांगण्यात आले. या माथेफिरूच्या दोन्ही हातांमध्ये बंदुका होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वर्गातील लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलविले.

Story img Loader