Firozabad, Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये एका विचित्र घटना घडली आहे. चोराला शोधायचं सोडून पोलीस न्यायाधीशांनाच शोधत बसले. पण हेसुद्धा एका पोलीस उपनिरिक्षकाच्या बेजबाबदार वृत्तीमुळे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दलं आहे.

आरोपीच्या घरी न्यायाधीशाची सखोल चौकशी

चोरीच्या एका प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या नावाऐवजी न्यायाधीशाचं नाव लिहिल्याने हा प्रकार घडला. गेल्या महिन्यात ही चूक उघडकीस आली. उपनिरीक्षक बनवारीलाल यांच्यावर आरोपीला न्यायालयीन घोषणा बजावण्याचे काम सोपवण्यात आले होते. राजकुमार यांनी न्यायालयात परत अहवाल दिला की आदेशात नाव देण्यात आलेली व्यक्ती नगमा खान सखोल चौकशीनंतरही त्यांच्या घरी सापडली नाही. खरंतर हे नाव मुख्य न्यायदंडाधिकारी यांचं होतं. त्यामुळे आरोपीच्या पत्त्यावर त्या सापडणं शक्यच नव्हतं.

पोलीस उपनिरिक्षकाची गंभीर चूक

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी २४ मार्च हे प्रकरण अत्यंत विचित्र असल्याचा निर्वाळा दिला. तसंच, न्यायालयीन कागदपत्रे बेजबाबदारपणे हाताळल्याप्रकरणी संतापही व्यक्त केला. त्यांनी पुढे असे निदर्शनास आणून दिले की उपनिरीक्षकाने कागदपत्रे नीट वाचली नाहीत आणि त्यांच्या कर्तव्याप्रती मूलभूत समज कमी असल्याचे दाखवले. याला गंभीर चूक असे संबोधून, मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी अशा निष्काळजीपणाच्या परिणामांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. कारण, कायदेशीर प्रक्रियांचे महत्त्वपूर्ण परिणाम होतात.

संतापलेल्या न्यायाधीशांनी काय म्हटलं?

“सेवा देणाऱ्या अधिकाऱ्याने सर्वोच्च पातळीची काळजी घेतली पाहिजे”, असे त्या म्हणाल्या. जर अशा अधिकाऱ्यांना जबाबदारीपासून पळ काढण्याची परवानगी दिली गेली तर ते नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना धोका निर्माण करू शकतात. खान म्हणाल्या की, उपनिरीक्षक बनवारीलाल यांनी “पूर्ण दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा” दाखवला होता आणि कर्तव्यात “घोर निष्काळजीपणा” दाखवला होता. भविष्यात अशी कोणत्याही “अनावश्यक कृत्य” रोखण्यासाठी त्यांनी आता उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.