सध्या देशात करोना रुग्णांची संख्या कमी झाली असून सर्व निर्बंध शिथील झालेले आहेत. मात्र आता तेलंगणा राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेला एक रुग्ण सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती ८० वर्षीय असून त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. विशेष म्हणजे या व्यक्तीने करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. INSACOG या जिनोम सिव्वेंसिंग करणाऱ्या संस्थेने याची पुष्टी केली आहे.

हेही वाचा : महिला वृत्तनिवेदकांनी चेहरा झाकण्याच्या सक्तीचा अंमल

ओमिक्रॉम विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेल्या तेलंगणा येथील व्यक्तीला सध्या सौम्य लक्षणे जाणवत आहेत. याआधी ओमिक्रॉनच्या बीए-४ आणि बीए-५ या उपप्रकारांमुळे दक्षिण आफ्रिकेत करोनाची पाचवी लाट आली होती. त्यांतर या उपप्रकराचा फैलाव युनायटेड स्टेट्स तसेच युरोपीय देशांमध्ये पसरला होता. याच कारणामुळे युरोपीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने ओमिक्रॉनच्या बीए-५ या उपप्रकाराला चिंताजनक म्हटलं आहे तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही या उपप्रकाराला दखलपात्र आणि चिंताजनक असल्याचे म्हणत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : कुतुबमिनार परिसरात खरंच उत्खनन होणार? सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

दरम्यान, या उपप्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत असली तर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण किंवा मृत्यूसंख्या वाढलेली नाही. भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले आहे. तसेच मागील करोना लाटांमध्ये नागरिकांमध्ये मिश्र रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतात सध्या मृत्यूसंख्या वाढण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

हेही वाचा : काँग्रेसला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा ; सोनिया गांधी यांचे ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या कार्यकर्त्यांना आवाहन

बीए-४ उपप्रकाराचे दोन रुग्ण

याआधी ओमिक्रॉन विषाणूच्या बीए-४ या उपप्रकाराची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. यातील एक रुग्ण हा हैदराबाद तर एक तामिळनाडू येथील आहे. हैदराबाद येथील रुग्ण दक्षिण आफ्रिकेमधून प्रवास करुन आलेला होता. विमानतळावर आल्यानंतर त्याची चाचणी केली गेली. तेव्हा त्याला बीए-४ या उपप्रकाराची लागण झाल्याचे समोर आले होते. तर तामिळनाडू येथील रुग्ण ही १९ वर्षीय महिला असून या महिलेचा परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. या महिलेने करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. तरीदेखील या महिलेला बीए-४ या उपप्रकारची लागण झाली होती.

Story img Loader