मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर भारताच्या मंगळयानाने पहिल्यांदाच मंगळाच्या पृष्ठभागाचे छायाचित्र पृथ्वीवर पाठविले. या ठिकाणचा देखावा सुंदर आहे, अशा आशयाचे ट्विटदेखील या मंगळयानाने केले आहे.
The view is nice up here. pic.twitter.com/VmAjNI76lm
— ISRO’s Mars Orbiter (@MarsOrbiter) September 25, 2014
भारताच्या मंगळयान मोहिमेने पहिल्याच प्रयत्नात मंगळाची कक्षा गाठून बुधवारी नवा पराक्रम केला होता. चीन आणि जपान या प्रगत देशांनाही जे जमले नाही ते करून दाखवत भारताने मंगळावर स्वारी करणाऱ्या पहिल्या आशियाई देशाचाही बहुमान मिळवला होता. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वी स्वारी केल्यामुळे नासा, युरोपीयन अंतराळ संस्थांच्या यादीत इस्त्रोने जागा पटकावली आहे.
यानाची क्षमता, त्यावरील उपकरणांची उपयुक्तता आणि एकूणच मोहिमेविषयीच्या शंका-कुशंकांना मागे टाकत मंगळयानाने गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने अवकाशात उड्डाण केले होते. त्यानंतर गेले ११ महिने मंगळयानाचा अविरत आणि अचूक प्रवास सुरू होता.