Former Us President Donald Trump Arrested : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाली. अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले. गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जावे लागलेले ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले. एक तासाच्या सुनावणीनंतर ट्रम्प यांना जामीन मिळाला. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेत असं काही घडले, असं कधीही वाटलं नव्हतं. मी केवळ एकच गुन्हा केला, तो म्हणजे ज्यांनी आपला देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला मी त्यांचा निर्भयपणे सामना केला. सुरुवातीपासून डेमोक्रॅटिक पक्षाकडून माझ्या प्रचार मोहिमेवर पाळत ठेवण्यात आली.”

Donald Trump
ISIS च्या तळांवर अमेरिकेचं एअर स्ट्राइक, दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर ट्रम्प यांची पोस्ट, “आता तुमच्यापैकी प्रत्येकाला….”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Donald Trump warns BRICS
“हा खेळ चालणार नाही”, डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स राष्ट्रांना इशारा; म्हणाले, “डॉलरला बाजूला करून…”
Guantanamo Bay trump
कुख्यात कैद्यांच्या तुरुंगात ट्रम्प बेकायदा स्थलांतरितांना पाठवणार; काय आहे ग्वांटानामो बे?
donald trump suspended condom programme for gaza
एक रुपयांच्या कंडोमवरही ट्रम्प यांनी घातली बंदी; गाझातील ५० दशलक्ष डॉलर्सचा कार्यक्रम रद्द; कारण काय?
Prithviraj Chavan On Meeting with Donald Trump
Prithviraj Chavan : “डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलो नाही…”, पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “त्यांचा मुलगा…”
Elon Musk and Sam Altman in conflict over the $500 billion AI project announced by Donald Trump.
Donald Trump : “त्यांच्याकडे पैसेच नाहीत”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच मोठ्या घोषणेची Elon Musk यांनी उडवली खिल्ली
What Elon Musk got on day 1 of new Trump administration
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसह एलॉन मस्क यांना मिळाल्या या गोष्टी; जाणून घ्या

“तुम्हाला आठवत असेल, त्यांनी माझ्याविरोधात खोट्या प्रकरणांमध्ये चौकशा लावत हल्ला केला. बेकायदेशीर आणि असंवैधानिक छापे टाकण्यात आले. ते न्यायालयाशी खोटं बोलले. एफबीआय आणि इतर तपास संस्था रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांवर हेतूपूर्वक कारवाया करत आहेत. निवडणूक नियमांमध्ये असंवैधानिक बदल करण्यात आले. यात निवडणूक आयोगाला राज्य विधिमंडळाकडून परवानगीची गरज नाही, अशी तरतूद करण्यात आली,” असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : विश्लेषण : डोनाल्ड ट्रम्प यांना अटकेची भीती का सतावतेय? पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलचा नेमका आरोप काय आहे?

“निवडणुकीत बेकायदेशीरपणे झालेलं बोगस मतदान सरकारी कॅमेऱ्यांसमोर झालं. नुकतेच एफबीआयने ट्विटर आणि फेसबूकला बायडन कुटुंबाचा पर्दाफाश करणाऱ्या लॅपटॉपविषयी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काहीही येऊ नये असं सांगितलं,” असाही आरोप ट्रम्प यांनी केला.

अशा प्रकारची कारवाई झालेले पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या ३० पेक्षा जास्त गुन्ह्यांचे आरोप केले आहेत. यातला सर्वात गंभीर आरोप आहे तो पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला तिचं तोंड गप्प ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा.

नेमकं हे काय प्रकरण आहे?

२०१६ च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवर केल्याचा ठपका डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण स्टॉर्मी डॅनियल्सशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांचं अफेअर असल्याचाही आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी १ लाख ३० हजार डॉलर्स दिल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी संमती देण्यात आली होती तेव्हापासूनच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप काय आहेत?

राॅयटर्स (Reuters) या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, मॅनहॅटन जिल्ह्याचे वकील अलविन ब्रॅग यांनी न्यू यॉर्क ग्रँड ज्युरी न्यायालयात पुरावा सादर करताना निदर्शनास आणून दिले की, ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी स्टॉर्मी डॅनियलला १ लाख ३० हजार डॉलर एवढी रक्कम देण्यात आली. स्टॉर्मीचे खरे नाव स्टेफनी क्लिफॉर्ड आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना ही रक्कम देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा : अग्रलेख: ट्रम्पुल्याचा चौफुला

ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी हे पैसे क्लिफॉर्डला दिले आणि त्यानंतर ट्रम्प यांनी मायकल कोहेन यांना या पैशांची भरपाई करून दिली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोहेन यांना दिलेल्या रकमेची नोंद ही कायदेविषयक सल्ला शुल्काच्या स्वरूपात करण्यात आली आहे. 

स्टॉर्मी डॅनियल कोण आहे? हे प्रकरण बाहेर कसे आले?

‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार, स्टॉर्मी डॅनियल २००६ पासून तिच्या या प्रेमप्रकरणाची गोष्ट विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तिने दावा केला की, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘द अँप्रेटिस’ (The Apprentice) या रिॲलिटी शोमध्ये काम देण्याचा बहाणा करून तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान २००६ साली या दोघांचाही एकमेकांसोबतचा एक फोटो प्रसिद्ध झालेला आहे.

Story img Loader