केरळमधील एका मच्छीमाराच्या नशिबाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. कर्ज थकवल्याप्रकरणी बँकेची घरावर जप्तीची नोटीस आल्याने निराश झालेल्या मच्छीमाराचे नशीब अवघ्या काही तासात पालटले. कर्ज चुकवण्याच्या विवंचनेत असलेल्या या मच्छीमाराला तब्बल ७० लाखांची लॉटरी लागली आहे. राज्य सरकारची ‘अक्षया’ लॉटरी लागल्याने कर्जात बुडालेल्या मच्छीमाराला दिलासा मिळाला आहे.

‘भगवान देता है छप्पर फाड के…’; शनिवारी तिकीट खरेदी केले, रविवारी रिक्षाचालकाला लागली २५ कोटींची लॉटरी

पोकुंजू, असे या मच्छीमाराचे नाव आहे. १२ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे मच्छीमारी करण्यासाठी पोकुंजू घराबाहेर पडले होते. दुपारी घरी परतल्यावर बँकेने घराच्या जप्तीची नोटीस पाठवल्याचे ऐकताच त्यांना धक्का बसला. “बँकेकडून नोटीस मिळाल्यानंतर आम्ही निराश झालो होतो. आता घर विकावं लागणार का? किंवा कर्जाबाबत आणखी काही करता येईल का? या विवंचनेत आम्ही होतो. मात्र, जेव्हा ही लॉटरी लागल्याचे कळले तेव्हा सुखद धक्का बसला”, अशी भावना मच्छीमाराच्या पत्नीने व्यक्त केली आहे. पोकुंजू यांनी घरासाठी बँकेकडून नऊ लाखांचं कर्ज घेतलं होतं.

विश्लेषण: रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढतं? प्री- डिनरने वजन नियंत्रणात मदत होते का? जाणून घ्या

घरात तणावाचं वातावरण असतानाच या कुटुंबाचं नशिब क्षणात पालटलं. बँकेची नोटीस मिळाल्यानंतर अवघ्या काही वेळातच लॉटरीच्या विजेत्यांची घोषणा झाली. यात पोकुंजू यांनी पहिल्या क्रमाकांची लॉटरी जिंकली. या पैशांमधून आधी कुटुंबावरील बँकेचे सर्व कर्ज फेडण्यात येईल. त्यानंतर उरलेल्या पैशांमधून मुलांच्या चांगल्या शिक्षणाची तजवीज करू, असे पोकुंजू यांच्या पत्नीनं म्हटलं आहे.