भारतात हत्येचा आरोप असलेल्या इटालीच्या दोन खलाशांपैकी एका खलाशाला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी चार महिन्यांसाठी मायदेशी जाण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मायदेशी जाण्याबाबत खलाशाने केलेली विनंतीला तत्त्वत: कोणतीही हरकत नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने ही मुभा दिली आहे.
इटालीचा खलाशी मस्सिमिलिआनो लॅटोर याने इटालीत जाण्याची आणि उपचार घेऊन भारतात परतण्याचा स्पष्ट आणि थेट तपशील दिल्यानंतरच मायदेशी जाण्याची परवानगी देणारा आदेश अमलात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने लॅटोर याला विशिष्ट उल्लेखांसह नव्याने हमीपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी सादर करण्यात आलेल्या हमीपत्रात खटल्याच्या अखत्यारीबाबतचा प्रश्न नमूद केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा