जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागली. या आगीमुळे पाच जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
पूंछमधील भिंबर गल्ली येथून तोटा गल्ली येथील लष्कराच्या ट्रकमधून रॉकेलची वाहतूक करण्यात येत होती. मात्र, चालत्या ट्रकला भररस्त्यात भीषण आग लागली. यामुळे पाच जवानांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने पूंछ येथे वीज कोसळली. यामुळे वाहनाला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
“भारतीय लष्करातील पाच जवानांनी या आगीत आपले जीव गमावले आहेत”, अशी प्रतिक्रिया जम्मूतील संरक्षण खात्यातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली