केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका छावणीला दहशतवाद्यांनी बुधवारी लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये पाच जवान शहीद झाले असून, अन्य सात जण जखमी झाले आहेत. गेल्या तीन वर्षांतील आत्मघाती स्वरुपातील हा पहिला हल्ला आहे.
बेमिना भागातील सीआरपीएफच्या छावणीवर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांनी सुरुवातीला लष्कराच्या छावणीवर एकामागून एक ग्रेनेड फेकण्यास सुरुवात केली. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी जवानांच्या दिशेन अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्यामध्ये ते दोन्ही दहशतवादी मारले गेले. त्यांच्यासोबत आणखी कोणी दहशतवादी होता का, याचा तपास वेगाने सुरू करण्यात आला असून, या भागातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
छावणीजवळच विविध सरकारी कार्यालये असून, तेथून हाकेच्या अंतरावर पोलिस पब्लिक स्कूलही आहे. फुटीरवाद्यांनी या भागात बंद पुकारल्यामुळे शाळेला बुधवारी सुटी होती. संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरुचा मृतदेह परत द्यावा, या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. या पूर्वी जानेवारी २०१० मध्ये काश्मिरात या स्वरुपाचा आत्मघाती हल्ला झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा