ट्विटरवरची टीव टीव तर नेहमीच चालू असते पण आता तुमच्या साहित्यप्रतिभेलाही धुमारे फुटण्याची संधी ट्विटरवर मिळणार आहे. १२ मार्चला ‘ट्विटर कादंबरी महोत्सव’ होणार असून हा महोत्सव या ट्विटर संकेतस्थळावरच होणार आहे, कुणीही त्यात सहभागी होऊन गोष्ट सांगू शकतो, त्यामुळे साहित्यिक नेटकरांनो एकच दिवस उरलाय तेव्हा लेखण्या नव्हे, माऊस सरसवा आणि लिहिते व्हा, असा संदेश ट्विटरच्या पक्ष्याने जणू दिला आहे.
असोसिएशन ऑफ अमेरिकन पब्लिशर्स व पेंग्विन रँडम हाऊस यांनी या महोत्सवाची दुसरी आवृत्ती यंदा आयोजित केली असून त्यात ट्विटरवर कादंबऱ्या लिहिणाऱ्या प्रतिभावान लेखकांची दालनेही असणार आहेत. २०१२ मध्ये पहिल्यांदा ट्विटर लेखकांचा पहिला महोत्सव घेण्यात आला होता व रोज जगभरातील लोक त्यांच्या कादंबरीतील कथासूत्रे ट्विटरवर आणीत असतात. त्यात काही पात्रे असतात, क्राउड सोर्सिगमधून आलेले कथापट असतात, काल्पनिक वर्णन असते व अनेक ट्विटर हँडल्स दिलेली असतात त्यांच्या मदतीने तुम्ही ती कथा गुंफत जाता. या सर्व महोत्सवात विजेत्या व जास्त खप असलेल्या लेखकांना पारितोषिके दिली जातात. एकूण २५ विजेते निवडले जातात.
अंकुर ठाकूर चित्रपट करणार
वेगवेगळ्या चित्रपटातील शॉट्स वापरून अंकुर ठाकूर हे बॉलिवूड चित्रपट तयार करणार आहेत. त्यात नृत्य, प्रेम, प्रेमभंग, विनोद हे सगळे काही असणार आहे, पण या चित्रपटांचे प्रदर्शन फक्त ट्विटरवरच होणार आहे, त्याचे अन्यत्र प्रदर्शन होणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा