गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील अलंग येथे जहाजे भंगारात काढण्यात येणाऱ्या कारखान्यात आज(शनिवार) वायुगळतीनंतर झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला. अलंग केंद्रातील प्लॉट क्रमांक १४०मध्ये काम सुरू असताना अचानक सुरू झालेल्या वायुगळतीचे रूपांतर स्फोटात झाल्याचे गुजरात मेरिटाईम मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेत अन्य दहा जण जखमी झाले असून त्यांना भावनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader