मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पक्षाच्या निवडणूक कार्यालयाजवळ करण्यात आलेल्या कार बॉम्बच्या स्फोटामध्ये पाच ठार, तर १५ जण जखमी झाले. या आठवडय़ात दहशतवाद्यांनी या पक्षाच्या कार्यालयावर केलेला हा दुसरा हल्ला आहे. मोठी लोकवस्ती असलेल्या उत्तर निझामाबाद भागामध्ये शुक्रवारी सकाळी हा कार बॉम्बचा स्फोट घडविण्यात आला. यात पक्षाचे पाच कार्यकर्ते ठार झाल्याचे एमक्यूएम पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. गेल्याच आठवडय़ामध्ये तेहरिक ए तालिबानने धर्मनिरपेक्ष पक्षांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या स्फोटामुळे संतापलेल्या नागरिकांनी निदर्शने करून पोलिसांवर दगडफेक केली. मंगळवारी करण्यात आलेल्या स्फोटामध्ये ४ ठार, तर ५० जखमी झाले होते.

Story img Loader